22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनबॉलिवूडमध्ये फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान

बॉलिवूडमध्ये फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान

कोंकणा सेनचा खुलासा

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वत्र भेदभाव केला जातो. सेटवर फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान मिळतो. इतरांना एखाद्या फर्निचरसारखी वागणूक दिली जाते. त्याना धक्के देखील दिले जातात. अशा वातावरणात काम करणे खूप कठीण असते, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने केला आहे. यासोबतच इंडस्ट्रीमधील लोक माणसाची जात आणि वर्ग ठरवतात, त्यांना कुठे बसायचे आणि कोणते पदार्थ खायला दिले पाहिजेत हे देखील ठरवले जाते, असा दावाही कोंकणाने केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक चमकदार गोष्टी सर्वांना आकर्षित करत असतात. पण झगमगत्या चंदेरी दुनियेतील काही धक्कादायक आणि कटू सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावतात. अनेक अभिनेत्री बॉलिवूडबद्दल अनेक चांगल्या- वाईट गोष्टीबद्दल नेहमी सांगत असतात. मात्र आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने बॉलिवूडमधील मोठे सत्य उघड केले आहे. बॉलिवूडमध्ये देखील धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव होतो असा कोणी विचार देखील केला नसेल. मात्र बॉलिवूडमध्ये देखील जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव केला जातो, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

कोंकणा सेनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. कोंकणाने आपल्या खासगी आयुष्यात देखील अनेक संकटांचा सामना केला आहे. तिने २००७ मध्ये रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये रहात होते. २०१० साली ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती, त्यानंतर रणवीर आणि कोंकणा यांचे लग्न झाले. लग्नानंतर कोंकणाने २०११ मध्ये मुलाला जन्म दिला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील कोंकणा-रणवीर नाते फार काळ टिकले नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR