निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील वांजरवाडा (शि) येथील शिवारात बोरवेलच्या केसंीगचे काम करीत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदरील घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. निलंगा तालुक्यातील शेतकरी शेतात बोरवेलच्या सभोवती गोल आकाराचा पंधरा ते वीस फूट खोल खड्डा खोदून बोरवेलचे केंिसग काढण्याचा शेतकरी योगेश उर्फ बंडू सतीश जाधव वय ३५ वर्षे व बस्वराज बाळाजी गड्डे वय ४० वर्षे हे दोघे खड्ड्यात उतरून केसींग काढत असताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मात्र परिसरातील लोकांनी बंडू जाधव यांना निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. बंडू जाधव यांचे निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. बंडू जाधव यांच्या पश्चात आजी, आजोबा,आई , वडील, पत्नी , एक मुलगा असा परिवार आहे तर बस्वराज गड्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी , एक मुलगी असा परिवार आहे. दोघाही मित्रावर वांजरवाडा (शि.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर बंडू जाधव यांच्या घटनेचा निलंगा पोलिसांनी पंचनामा करून सदरील प्रकरण शिरूर आनंतपाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याचे समजते.