वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर घेऊन गेलेल्या ‘स्टारलायनर’ स्पेसक्राफ्टमुळे बोईंगची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्टारलायनर ५ जूनला सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर घेऊन गेलं. १३ जूनला दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार होते. पण थ्रस्टरमध्ये बिघाड आणि हेलियम लीकेजमुळे ठरलेल्या वेळेत हे यान पृथ्वीवर परतू शकले नाही. ८ दिवसाच्या टेस्ट मिशनवर गेलेले विलियम्स आणि विल्मोर आता दीर्घकाळानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. दोघेही अंतराळवीर आता नासाच्या क्रू९ मिशनचा भाग आहेत.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, स्टारलायनर भारतीय वेळेनुसार सकाळी ३.३० वाजता स्पेस स्टेशनपासून वेगळं झालं. ९ वाजून ३२ मिनिटांनी अमेरिकेच्या न्यू मेक्सिको व्हाइट सँड स्पेस हॉर्बरमध्ये लँड झाले. हा वाळवंटी प्रदेश आहे. स्टारलाइनरच्या लँडिंग वीडियोमध्ये स्पष्टपणे दिसते की, लँड होण्याआधी स्पेसक्राफ्टचे ३ पॅराशूट ओपन झाले. त्याद्वारे पृथ्वीवर सुरक्षित लँडिंग झाले.
स्टारलायनरने ८.५८ मिनिटांनी डीऑर्बिट बर्न पूर्ण केलं. या बर्ननंतर जमिनीवर लँड होण्यासाठी ४४ मिनिट लागली. लँडिग करताना वातावरणात हीटशिल्ड एक्टिव होतं. त्यानंतर ड्रोग पॅराशूट डिप्लॉय करण्यात आले. तीन पॅराशूट तैनात झाल्यानंतर रोटेशन हँडल रिलीज करण्यात आलं. जेणेकरुन स्पेसक्राफ्टने गोल फिरणं बंद करावं. सरळ, एका स्थितीत लँड केलं पाहिजे. खालच्या बाजूला असलेलं हिट शील्ड काढण्यात आल. त्यानंतर एयरबॅग ओपन झाले. त्यानंतर रिकवरी टीम येऊन स्पेसक्राफ्टला रिकव्हर केले.