नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय विमान वाहतूक नियामकाने बोईंग-७३७ जेटलाइनर चालविणा-या विमान कंपन्यांना रडार घटकांशी संबंधित सुरक्षेबाबत इशारा देण्यात आला आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने विमान कंपन्यांना संभाव्य ठप्प किंवा प्रतिबंधित रडार कंट्रोल सिस्टमबद्दल इशारा दिला. एअरक्राफ्ट रडार ही प्राथमिक यंत्रणा आहे जी जेटचा वेग नियंत्रित करते. एअर इंडिया एक्स्प्रेस, स्पाईसजेट आणि आकाशा ही बोईंग-७३७ सीरिजची विमाने देशात चालवली जातात. ‘डीजीसीई’ने या ऑपरेटर्सना सुरक्षितता जोखमीचे मूल्यांकन करण्यास आणि विशिष्ट प्रकारचे इन्स्ट्रुमेंट लँडिंग थांबविण्यास सांगितले आहे.
७३७ विमान हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर चालवले जाणारे हेरिटेज विमान आहे. भारतीय हवाई दल बोईंग ७३७ विमाने देखील चालवते आणि त्यांच्याकडे व्हीआयपी स्क्वॉड्रन्स आहेत. अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही ७३७ विमानातून उड्डाण करतात.
अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग ७३७-९ मॅक्स विमानाचा आपत्कालीन दरवाजा हवेत उखडल्याच्या घटनेनंतर डीजीसीएने भारतीय विमान कंपन्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. कोणत्याही भारतीय हवाई ऑपरेटरकडे अद्याप बोईंग ७३७-९ मॅक्स नाही.