परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ऊती संवर्धन संशोधन केंद्र आणि कृषी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी जागरूकता कायार्नुभव कार्यक्रम अंतर्गत परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त हरीत क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठातील कृषी कन्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
सदरील कार्यक्रमास सरपंच दगडु काळदाते, माजी सदस्य नाईक, ग्रामस्वच्छता अभियानाचे बाबासाहेब गाडगे, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याद्यापक पोले, शेवाळकर, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ब्राह्मणगावचे सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, रावे केंद्र प्रमुख डॉ. आनंद दवंडे आणि रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश दडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या सरिता सावंत, स्नेहल शिराळे, दिपाली सोनावळे, सोनाली शिंदे, पुर्वा शिंदे, मनिषा शिंदे, आरती सुर्यवंशी, निता रुद्राक्ष, प्रांजल रेगुलवाड, शुभांगी राऊत, दिपाली राऊत, सुहर्षा वसमतकर, ज्ञानेश्वरी गाडगे, मिताली पवार, पुष्पा रसाळ, प्रियांका गोंडगे, ओजस्वी गडांबे, डिंपल राऊत, ॠतुजा नकाते, श्रुती येरावाड, पल्लवी वराडे, वैष्णवी तिडके, शितल ठोंबरे, जयश्री शिंगणे, शुभांगी थिटे आणि प्रांजली थिटे यांनी परीश्रम घेतले.