28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रब्रेक फेल झाल्याने हिरकणी बस उलटली ; ४० विद्यार्थी जखमी

ब्रेक फेल झाल्याने हिरकणी बस उलटली ; ४० विद्यार्थी जखमी

पालघर : प्रतिनिधी
पालघरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी हिरकणी बस उलटल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुमारे ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातानंतर सर्व जखमींना वाडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बसचे ब्रेक फेल असल्याचे माहिती असूनही प्रवास सुरू होता. त्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.

पालघरमधील वाडा बसस्थानकातून ही हिरकणी बस आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. बस वाडाहून आमगावकडे जाताना कुमदल या गावापाशी चढ चढत असताना बस बंद पडली व मागे सरकू लागली.

यावेळी बसचालकाने ब्रेकने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. यामुळे बस मागे उताराला आल्याने उलटली  झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR