लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हा परिषदेने सरत्या वर्षात अनेक चांगले जनहितार्थ निर्णय घेऊन विविध उपक्रम हाती घेवून मार्गी लावले. आझादी का अमृत महोत्सवा निमित्त जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी दर्जेदार शहिद जवानांच्या स्मरनार्थ स्मारक उभारले आहे. तसेच लातूर जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या मियावाकी बागेतही शहिद जवानांच्या स्मरनार्थ स्मारक उभारले आहे. या स्मारकाच्या भिंतीवर कोनशिला भंगलेलेल्या अवस्थेत असताना सुध्दा या भंगलेल्या कोनशिलाच्या स्मारकाचे लातूर जिल्हा परिषदेचे नुतन मुख्यकार्य अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी थाटात उद्घाटन झाले. गेल्या ५ महिण्यानंतरही भंगलेल्या कोनशिलेची दुरूस्ती कराण्याचा निर्णय होऊन लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर हा लागलेला काळा डाग दुरूस्ती करून पुस्ता आला नाही. लातूर जिल्हा परिषदेवर व जिल्हयातील १० पचांयत समितीत सध्या प्रशासक राज आहे. गेल्या दोन वर्षापासून या दोन्ही स्थानीक स्वराज्य संस्थेत सदस्य नसल्याने १५ वित्त आयोगाचा निधी देण्याचे काम शासनाने थांबवले आहे. त्यामुळे प्रसंगी ग्रामीण भागाच्या विकासाला खिळ बसली आहे. जि. प. आणि पं. स. सदस्य आपल्या मतदार संघात विकास निधी खेचण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून ही प्रक्रीया पूर्णपणे थांबली आहे.
५ वी ते ८ वी च्या ३० विद्यार्थ्यांना इस्रोची हवाई सफर
लातूर जिल्हा परिषदेच्या इयत्ता ५ वी ते ८ वी च्या शाळेतून निवडलेल्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड भारतीय अंतराळ संशोधन केंद्र, बेंगलोर (इस्रो) येथे भेट देण्यासाठी करून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना हावाई सफर घडवली. या कालावधीत विद्यार्थ्यांनी अनेक स्थळांना भेटीही दिल्या. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राला भेट दिल्याने विद्यार्थ्यांंच्या शैक्षणीक प्रगतीत ही उर्जा नेहमी प्रोत्साहान देणार आहे. कव्हा, परचंडा ठरले जिल्हा सुंदर गाव आर. आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनांतर्गत २०२१-२२ मधील तालुका सुंदर गाव मध्ये प्रथम आलेल्या १० तालुक्यातील ेणापूर तालुक्यातील सारोळा, अहमदपूर-परचंडा, जळकोट-विराळ, शिरूर अनंतपाळ-थेरगाव, देवणी-वलांडी, उदगीर-नळगीर, चाकूर -कबनसांगवी, लातूर-कव्हा, निलंगा-येळनूर, औसा तालुक्यातील बोरगाव या गावांची तपासणी केली होती. या तपासणीतून जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या गुणांकणाच्यानुसार लातूर तालुक्यातील कव्हा व अहमदपूर तालुक्यातील परचंडा या ग्रामपंचायतींची जिल्हा सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र या गावांना वर्ष संपत आले तरी पुरस्काराचा निधी मिळाला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
आशा स्वयंसेवीकांकडून गावातच प्राथमिक उपचाराची सोय
जिल्हयातील नागरीकांचे आरोग्य सदृढ रहावे, नागरीकांना गावातल्या गावातच प्राथमिक उपचार व औषधी मिळावी म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १ हजार ७०३ आशा स्वयंसेवीकांना प्राथमीक उपचाराची अद्यावत औषधी कीट देण्यात आली आहे. असा स्वरूपाचा प्रायोगीक तत्वावरचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरीकांना गावातल्या गावातच ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी अशा सर्वसाधारण आजारांच्या प्राथमिक उपचाराची सोय आशा स्वयंसेवीकांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
आयुक्तांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती
लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाला राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांडरे यांनी भेट देऊन कोणत्या कार्यासनाला काय काम चालते याची पाहणी केली होती. या पाहणीत फाईलमधल्या चुका अधिकारी व कर्मचा-यांना निदर्शनास अणून देत सदर फाईलमधील त्रूटी व दिरंगाईला आपण थारा का देता असा प्रश्न उपस्थित करताच अधिकारी व कर्मचा-यांची चांगलीच झाडा झडती घेतली होती. तसेच त्यांनी कामकाजात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सदर घटनेची शिक्षण आयुक्त मांडरे यांनी गंभीर दखल घेतली होती.
शिक्षणच्या बिंदू नामावलीवर मागासवर्गीय कक्षाची मोहर
लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने छत्रपती संभाजी नगर येथील मागासवर्गीय कक्षाकडे बिंदू नामावलीचा प्रस्ताव तीन वेळा सादर केला होता. सदर कार्यालयाने वेळोवेळी चुका काढत प्रस्ताव परत पाठवले होते. यामुळे शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक झाली होती. शिक्षण विभागाच्या दोन-तीन कर्मचा-यांनी कांही दिवस छत्रपती संभाजी नगर येथे तळ ठोकून होते. चौथ्यांदा सुचवलेल्या सुचनांनुसार बदल करून प्रस्ताव सादर केल्याने छत्रपती संभाजी नगर येथील मागावर्गीय कक्षाने सदर प्रस्तावाला मंजूरी देत बिंदू नामावलीच्या प्रस्तावावर अखेर मोहर उमटवल्याने शिक्षण विभागाची धावपळ थांबली.
१८ महिलांवर गर्भाशयमुख कर्करोगाची शस्त्रक्रिया
लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभामार्फत राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी अभियानातंर्गत ११६ महिलांना प्राथमिक स्वरूपात कर्करोगाचे लक्षणै दिसून आली होती. त्यापैकी १८ महिलांच्यावर गर्भाशय मुख कर्करोगाची शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. उर्वरित महिलाना शस्त्रक्रीयेची गरज नसल्याने गोळया औषधी देऊन उपचार करण्यात येत आसून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यामार्फत त्यासाठी सतत पाठ पुरावा करण्यात येत आहे.
यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जि. प. तृतीय
यशवंत पंचायतराज अभियानातंर्गत विभागीय आयुक्त नियुक्त राज्यस्तरीय पथकाने लातूर पंचायत समिती, जळकोट पंचायत समितीची व लातूर जिल्हा परिषदेच्या स्वमूल्यांकनाची तपासणी करून शासनाने जाहिर केला. या निकालात यशवंत पंचायतराज अभियानात अत्युत्कृष्ट लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम आली आहे. तर लातूर जिल्हा परिषद तृतीय आली आहे. विभागीय स्तरावर लातूर पंचायत समिती प्रथम तर जळकोट पंचायत समिती द्वितीय येण्याचा मान मिळवला.
लातूरची माती दिल्लीच्या अमृत रोप वाटीकेत पोहचली
माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातून ७८६ ग्रामपंचायती मधील ९४२ गावातून, नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रातून एकत्र केलेले मातीचे १२ अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली येथील नविन संसद भवनाच्या जवळील कर्तव्य पथावर पोहचली. देशातील प्रत्येक गावातून संकलीत केलेल्या ७ हजार ५०० पेक्षा जास्त कलशातील मातीतून येथे अमृत रोप वाटीका उभारली जाणार आहे.