27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभटकती आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार

भटकती आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार

शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
मी म्हणेल त्या पद्धतीने लोकशाही हाच एककलमी कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केला आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि तुमचा मूलभूत अधिकार वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल आणि निवडणुकीतून भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या प्रवृत्तीचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करावा लागेल. त्यामुळे आता हा महाराष्ट्रातील भटकता आत्मा यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई येथील बीकेसी मैदानावर शुक्रवारी सायंकाळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा झाली, त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खा. संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधानांसमोर एखादा कोणी भूमिका मांडत असेल, तर त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगले काम केले. शाळा, आरोग्याच्या सुविधा देऊन दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करुन अरविंद केजरीवाल काम करत आहेत. मात्र, नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकले. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

नकली शिवसेनेवरून मोदींवर जोरदार निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, तुम्ही नकली शिवसेना म्हणताय, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला संकट काळात वाचवायचे काम केले, हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही विसरला असाल. परंतु तेच बाळासाहेबांचे विचार उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत, त्या विचाराच्या पाठिशी शक्ती उभी केल्याशिवाय महाराष्ट्रातील मराठी तरुण, महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील माणूस राहणार नाही. मी म्हणेल त्या पद्धतीने लोकशाही हाच एककलमी कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केला. तुम्ही आमच्याबद्दल काहीही म्हटले, आमच्यावर कितीही टीका टिपण्णी केली, तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील माणूस ढुंकूनसुद्धा बघणार नाही, असेही पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR