17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न

भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न

सावली : प्रतिनिधी
ब्रह्मपुरी मतदारसंघात भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्रात सर्वधर्मसमभाव, सर्व समाजबांधवांना समान न्यायाची वागणूक देणारा लोकप्रतिनिधी, अशी माझी ओळख आहे. मला अशा कटकारस्थानांचा तीळमात्रही फरक पडणार नाही, असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिले.

सावली तालुक्यातील हिरापूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाची रक्तवाहिनी असून माझी काँग्रेसची फळी अतूट बांधल्या गेली आहे. येणा-या निवडणुकीत माझ्यावर राज्याच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी असल्याने आपण खुद्द माझा बूथ माझी जबाबदारी व मीच उमेदवार या मूलमंत्राने जोमाने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात समृद्ध शेतीसाठी गोसेखुर्द व घोडाझरी धरणाचे पाणी पोहोचविले. शुद्ध पेयजलासाठी गावोगावी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, सामाजिक सभागृहे, वाचनालये ग्रामपंचायत भवन, प्रशासकीय कार्यालयासाठी प्रशस्त इमारती, आरोग्य केंद्रांसाठी प्रशस्त इमारती, रुग्णवाहिका, बस स्थानक, अशा अनेक सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी शासन स्तरावरून खेचून आणला याकडे लक्ष वेधले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR