23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार

भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या पराभवात देवेंद्र फडणवीस यांचाच सर्वांत जास्त हात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. अनेक ठिकाणी भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. यावर बोलताना अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्यामुळे भाजपला सर्वांत जास्त फटका बसल्याचे देशमुख म्हणाले.

वर्ध्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे विजयी झाले आहेत. वर्ध्यात शरद पवार यांच्यासाठी विदर्भातील ही एकमेव जागा प्रतिष्ठेची होती. इथे शरद पवार गटाचा विजय निश्चित झाला आहे. प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा त्यांच्यावरच उलटल्याचे वक्तव्य देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR