31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रभाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वाशिम : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.

आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचे वृत्त आल्याने, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून १९९७ ते २००३ पर्यंत विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

२००४ ते २००९ पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदारसंघात विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत २०११ मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती . मात्र २०१४ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. ते निवडून आले.

त्यानंतर भाजपकडून त्यांना जिल्हाअध्यक्षपद दिले गेले, २०१९ मध्ये ते पुन्हा कारंजा मतदारसंघात भाजप आमदार म्हणून निवडून गेले. कोरोना काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला होता. त्याच दरम्यान किडनी विकाराने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर झाल्याचे निदान झाले. गेल्या काही महिन्यापासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथ ते उपचार घेत होते. आज त्याचं सकाळी ९ च्या सुमारास निधन झाले. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीयासह भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR