25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयभाजप उमेदवारावर दगडफेक

भाजप उमेदवारावर दगडफेक

गारपेटा : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या ६ टप्प्यांतील मतदान नुकतेच पार पडले. यावेळी ७६ कोटी ४१ लाख मतदार पात्र होते. त्यांच्यापैकी ५० कोटी ७२ लाख मतदारांनी हक्क बजावला. अशात अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन बंद पडल्याचे समोर आले तर कुठे गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. याच दरम्यान, पश्चिम बंगालमधील भाजप पक्षाच्या उमेदवाराला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

झारग्राममधील भाजपच्या लोकसभा उमेदवाराचा मंगलापोटा भागातील आंदोलकांनी पाठलाग केला. शनिवारी सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली.

सुरक्षा कर्मचारी उमेदवार प्रणत तुडूला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत आणि एक मोठा दगड काही अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्ती फेकून मारण्याचा प्रयन्त करत आहेत. जवळच आणखी काही लोक त्यांच्यावर दगड फेकत आहेत. यानंतर उमेदवार, सुरक्षा अधिकारी आणि काही मीडिया कर्मचारी पळताना दिसत आहेत. तुडू यांनी या घटनेसाठी ‘तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या गुंडांना’ जबाबदार धरले आहे. त्यांनी दावा केला की त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचा-यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR