20.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरभाजप पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मधील रेणापूर नगरपंचायतीचे माजी उपसभापती शास्त्री चव्हाण, भातांगळी येथील भाजपचे लातूर तालुका सरचिटणीस राजकुमार जाधव यांच्यासह अनेकांनी दि. १ नोव्हेंबर रोजी  माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव  देशमुख व लातूर ग्रामीणचे  आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व लोकनेते विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर रेणापूर नगरपंचायतीचे माजी उपसभापती शास्त्री चव्हाण, भातांगळी येथील भाजपचे लातूर तालुका सरचिटणीस राजकुमार जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीचे  माजी सदस्य तानाजी पाटील, हरिदास कुमठेकर, अमोल जाधव, अशोक कांबळे, पृथ्वीराज पाटील, चेतन लंकेश्वर, महेश भारती, कृष्णा पारसेवार, ओमकार गोरे, संकेत कांबळे, सुमित सवई , सुयश  चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, काँग्रेसचे रेणापूर तालुकाध्यक्ष  प्रमोद जाधव, सचिन दाताळ, राजकुमार पाटील, रमेश सूर्यवंशी, शिवराज सपताळ, चंद्रचूड चव्हाण, धनराज देशमुख, शिखंडी हरवाडीकर, विश्वासराव देशमुख, धनंजय जाधव, बाळासाहेब  जाधव, मुकेश राजमाने, हरिश बोळंगे, बालाजी सुरवसे, डॉ. प्रशांत जाधव, अभिजित चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR