17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरभाजीपाला विक्रेत्यांनी थाटला गल्ली बोळात व्यवसाय

भाजीपाला विक्रेत्यांनी थाटला गल्ली बोळात व्यवसाय

लातूर : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठे म्हणून ओळख असलेली गंजगोलाई, दयानंद गेट ते संविधान चौकापर्यंतच्या जुने रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील भाजीपाला, फळे व इतर छोट्या-छोट्या व्यवसायिकांनी आपली दैनंदिन उपजिवीका भागवण्यासाठी आपली दुकाने थाटली होती. मागील काहि दिवसात मनपा प्रशासन व वाहतूक शाखा प्रशासन यांनी शहरीतील अतीक्रमाच्या नावाखाली किरकोळ व्यवसायकांना उटवले आहे. त्यानंतर किरकोळ व्यवसायकांनी शहरातील गल्ली, बोळात आपली दुकानी थाटली असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील गजबजलेली गंजगोलाईतील सर्व हातगाडे, भाजीपाला विक्रेत्यांना मागील काहि दिवसात गंजगोलाईतून हटविण्यात आले आहे.  गंजगोलाईले गेल्या काहि दिवसापासून मोकळा स्वास घेतला असला तरी काहि किरकोळ व्यापा-यांची दैनंदिन उपजिवीका आता भागवणे सुधा कटिन झाली आहे. महापालीकाकडून व्यापा-यांना पुर्णवसन करण्यासाठी जागा देण्यात आली असली तरी काहि व्यापारी त्या जागेवर जात नाहित. त्यामुळे काहि व्यापा-यांनी आपल्या परिने आपले दुकाने जागा असेल त्याठीकानी गल्ली, बोळात थाटली आहेत.
शहरातील दयानंद गेट ते सविधान चौक या समानंतर रस्त्यावर गेल्या काहि दिवसापासून किरकोळ व्यापा-यासह शेतकरी रस्त्यावर भाजीपाला फळ, शहाळे, फुले, क्रॉकरी, राईस, वडापाव, भेळ, पाणीपुरी आदींसोबतच इतरही छोटे-छोटे व्यवसाय करून आपली उपजिवीका भागवणा-या व्यवसायकांना हटवले. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर भाजीपाला, फळे विकले जात होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात मोठी गर्दी होत असे. हा संपूर्ण परिसर भाजीपाला विक्रेत्यांनी व्यापून टाकला होता. मात्र मनपा प्रशासन व वाहतूक शाखेच्या वतिने या भागातीलही व्यापा-यांना हटवून देण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातीलही व्यापा-यांनी आपले दुकाने प्रकाश नगर रोडवर थाटली आहे. त्यामुळे या परिसरात आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर काहि व्यवसयाकांनी आपली दुकाने गल्ली, बोळात थाटली असल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR