23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाभारताच्या लेकीची सुवर्ण भरारी

भारताच्या लेकीची सुवर्ण भरारी

पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक आले

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला केवळ सहा पदके जिंकता आली. यामध्ये एकाही सुवर्ण पदकाचा समावेश नव्हता. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेच्या दुस-याच दिवशी सुवर्ण पदक जिंकता आले. अवनी लेखरा हिने सोनेरी कामगिरी करत तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्ण पदक पटकावले आणि अवनी देशाच्या अपेक्षांवर खरी उतरली.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एका सुवर्ण पदकासह दोन पदके जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक जिंकून कमाल केली. तिने स्पर्धेच्या दुस-याच दिवशी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. अशा प्रकारे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. याशिवाय भारताच्या मोना अग्रवालने याच स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

दरम्यान, मागील ऑलिम्पिकमधील आपलाच विक्रम मोडण्यात अवनीला यश आले. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २४९.६ च्या स्कोअरने पॅरालिम्पिकमध्ये विक्रम बनवला होता. यावेळी तिने २४९.७ धावा केल्या आणि तिचाच पॅरालिम्पिकमधील विक्रम मोडला. तर, भारताच्या मोना अग्रवालने २२८.७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आणि तिला कांस्य पदक मिळाले. दक्षिण कोरियाच्या युनरी लीने २४६.८ गुण मिळवत रौप्य पदक पटकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR