नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात लवकरच हायड्रोजन संचालित रेल्वे धावणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे.
भारतीय रेल्वे प्रथम ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास देखील ७० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पहिली हायड्रोजन रेल्वे जींद-सोनीपत मार्गावर धावू शकते. हरियाणात रेल्वेसाठी हायड्रोजन १ मेगावॅट पॉलीमर इलेक्ट्रोलाइट मेंब्रेन इलेक्ट्रोलाइजरकडून प्राप्त होईल, जे जींदमध्ये स्थापित असेल. तेथे प्रतिदिन सुमारे ४३० किलोग्रॅम हायड्रोजन तयार केला जाणार आहे. तेथे ३ हजार किलोग्रॅम हायड्रोजन स्टोरेजची देखील क्षमता असणार आहे.
यात इंजिनच्या जागी हायड्रोजन फ्यूल सेल्स लावले जातात. या रेल्वे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन किंवा पार्टिक्युलेट मॅटर यासारखे प्रदूषक उत्सर्जित करत नाहीत. यामुळे प्रदूषण होणार नाही. अशाप्रकारच्या रेल्वेला हायड्रेल देखील म्हटले जाते. या रेल्वेत चार डबे असू शकतात. या रेल्वेला नीलगिरी माउंटेन रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन, कालका शिमला रेल्वे, कांगडा खोरे आणि बिलमोरा वाघई आणि मारवाड देवगढ मदारिया मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. ही रेल्वे १४० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहे. कपुरथळा आणि इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत ही रेल्वे तयार केली जात आहे.