27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरभारतीय संविधान सर्वसामान्यांचे आहे बळ 

भारतीय संविधान सर्वसामान्यांचे आहे बळ 

अ‍ॅड. मनोहरराव गोमारे 
साहित्यनगरी, लातूर:  
भारतीय संविधान हे सर्वसामान्य नागरिकांचे बळ  असून हे बळ  बदलले गेल्यास सर्वकाही संपेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.  महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या दुस-या दिवशी ‘भारतीय संविधान व आजचे वर्तमान’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरुन डॉ. लुलेकर आपले विचार व्यक्त्त करत होते. या परिसंवादात प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. केशव अलगुले यांनीही सहभाग नोंदवला. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी यावेळी बोलताना  साधारणत: २० -२२ वर्षांपूर्वी राज्यघटनेची चिंता फारसे कोणी करत नव्हते. मात्र आता परिस्थिती पूर्णत: बदलल्याचे निदर्शनास येते.
 राज्यघटनेत दुरुस्ती सुचवली गेली तरी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेला सर्वोच्च न्यायालयाने मूळ गाभा मानले असल्याने त्यात दुरुस्ती करता येत नाही. म्हणजेच मूलभूत हक्काला हात लावता येत नाही. घटनेने धार्मिक स्वातंर्त्र्याला बंधने घालून दिली असून दुस-या धर्माच्या व्यक्त्तींना, प्रार्थना स्थळांना बाधा पोहचवता येत नाही, हे सर्वज्ञात आहे. काँग्रेसने मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा कांगावा काही मंडळी करताना दिसतात. तसे असते तर मुस्लिमांची प्रगती का होऊ शकली नाही? असा परखड सवालही डॉ. लुलेकर यांनी उपस्थित केला.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती एक मत हे मूल्य रुजवले. त्यांच्या एका वाक्याच्या ठरावावर महिलांना मानाचा  मताचा अधिकार मिळाला, या गोष्टी कदापि विसरता येणार नाहीत. आजच्या वर्तमानात अनेक गोष्टी हेतुत: घटनाबा  केल्या जात असल्याचे निदर्शनास येते. हे योग्य नाही, हे  पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. केशव अलगुले यांनी सर्वसामान्य लोकांनी संविधानाचे पठन  केले पाहिजे, धार्मिक ग्रंथाच्या पारायणाऐवजी भारतीय संविधानाचे पारायण केल्यास लोकांना त्यांचे अधिकार कळतील असे मत व्यक्त्त केले. तर डॉ. अशोक नारनवरे यांनी भारतीय संविधान हे क्रांतिकारी संविधान असून ते चळवळीतून आकाराला आल्याचे सांगितले. डॉ. कमलाकर कांबळे यांनी आपले विचार व्यक्त्त करताना आपला देश पारतंर्त्यात जाण्याचे कारण लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळाला नाही हे असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक यु. डी. गायकवाड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या परिसंवादाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विषद केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR