नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंग्लंडला हरवत भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ एक चांगली धावसंख्या उभारू शकला.
भारताने इंग्लंडला धूळ चारत १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळविला आणि या विजयासह भारताने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
२०२२ मध्ये झालेल्या टी २० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव करून बाहेर काढले होते. त्यामुळे गतविजेत्या इंग्लंडकडून पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी रोहितकडे आली होते. त्याचे रोहितने सोने केले आणि इंग्लंडला चांगलेच धुतले. तसेच रोहित ब्रिगेडला दशकाहून अधिक काळ बाद फेरीत सुरू असलेली पराभवाची मालिका तोडण्याची संधी मिळाली होती आणि त्याचेही सोने भारतीय संघाने केले.