27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

- आदिवासी ,दलित संघटनांना काँगे्रसचा पाठिंबा - बिहारमध्ये जाळपोळ

नवी दिल्ली : आदिवासी आणि दलित संघटनांनी आज ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस, बसपा आणि आरजेडीसारख्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनायझेशन्स (एनएसीडीएओआर) ने उपेक्षित समुदायाचे मजबूत प्रतिनिधित्व आणि संरक्षणाच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे.

एनएसीडीएओआरने एससी-एसटी आणि ओबीसींसाठी न्याय आणि समानता यासह मागण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या ‘बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. येथे अनेक ठिकाणी जाळपोळही झाली आहे. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पोलिस अलर्टवर आहेत.

आंदोलन करणा-या दलित आणि आदिवासी संघटनांनी न्यायालयाचा निर्णय फेटाळण्याची मागणी सरकारला केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एससी-एसटीच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. सरकारी सेवेतील कर्मचा-यांची जातनिहाय आकडेवारी तातडीने जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

समाजातील सर्व स्तरांतील न्यायिक अधिकारी आणि न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारतीय न्यायिक सेवा स्थापन करण्याची मागणी केली असून, एससीमध्ये कोणत्याही एका जातीला १०० टक्के कोटा देऊ नये, अशी या संघटनांची मागणी आहे.

आज भारत बंद का आहे?

सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच एक निर्णय दिला होता, ज्यामध्ये त्याने राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांमध्ये स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यास मान्यता दिली होती. आरक्षणाचा लाभ सर्वाधिक गरजूंना मिळावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निदर्शने होत आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाला दलित आणि आदिवासींनी विरोध करत हे समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली जात आहे.

या पक्षांनी दिला ‘भारत बंद’ला पाठिंबा

दरम्यान, या ‘भारत बंद’ला बसपा, राजदने पाठिंबा दिला आहे. याशिवाय चिराग पासवान यांच्या पक्षानेही पाठिंबा दिला आहे. यासोबतच भीम आर्मीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद, काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR