बोरी : येथे श्री भास्कराचार्य सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन व वाचन संवाद हे कार्यक्रम घेण्यात आले. या निमित्ताने तीन दिवसाचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे गजानन चौधरी, तुकाराम सर्जे, संतोष तायडे, भास्करराव चौधरी, अभिजित चौधरी, आनंद मुरक्या, संतोष लाहाने मुंजा कंठाळे, शम्मु पटेल, शेख नईमुद्दीन गणेश ठाकूर, शेख हानिफ, अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनास पत्रकार बांधव, गावकरी एकलव्य स्कॉलर अकॅडमीचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. एक तास सामूहिक वाचन संवाद या कार्यक्रमास शंभर दीडशे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला.
ग्रंथ प्रदर्शनास जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी भेट दिली. तर एकलव्य स्कॉलर अकॅडमीचे संचालक विशाल देशमुख, नंदकुमार गिरी, दिगंबर वाघमारे यांनी वाचन संवाद विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे अध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ.अरुण चौधरी, संचालक राम नवाळ, मारोती शिंपले, सदाशिव चौधरी, संतोष तायडे, रोहित घातगिने, मयूर टाक, रामेश्वर शिंपले, सुभाष चौधरी, माणिक चौधरी, संतोष लांडगे, नाना हरकळ, गजानन आडणे, गजानन अंभुरे, दत्तराव जाधव, सुभाष मुरक्या, किशोर शहाणे, डाके, वाचक वर्ग उपस्थित होता.
प्रास्ताविक ग्रंथ मित्र मधुकर चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन लिपिक रामा ढाकरगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशंकर चौधरी, झेलबा शिंपले, दत्ता शिंपले यांनी परिश्रम घेतले.