20.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रभुमरे, चव्हाण जरांगेंच्या भेटीला

भुमरे, चव्हाण जरांगेंच्या भेटीला

जालना : प्रतिनिधी
भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अशोक चव्हाण हे सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का, हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिल. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वयाची आवश्यकता आहे. हा विषय लवकर संपावा, अशी आमची भावना असल्याने आपण आल्याचे चव्हाण म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR