19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयभोपाळच्या कारखान्यातून १,८१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

भोपाळच्या कारखान्यातून १,८१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गुजरात एटीएस, एनसीबीने केली संयुक्त कारवाई

भोपाळ : भोपाळमधील एका कारखान्यातून एमडी ड्रग्ज आणि त्याचा १,८१४ कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गुजरात एटीएस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) संयुक्त कारवाईत ही जप्ती करण्यात आली आहे.

गुजरातचे गृहमंत्री संघवी यांनी अमली पदार्थाविरुद्धच्या लढाईत मोठा विजय मिळवल्याबद्दल गुजरात एटीएस आणि दिल्ली एनसीबीचे अभिनंदन करत अलीकडेच त्यांनी भोपाळमधील एका कारखान्यावर छापा टाकला आणि एमडी आणि एमडी बनवण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले, ज्याचे एकूण मूल्य १,८१४ कोटी रुपये आहे. हे यश अमली पदार्थांची तस्करी आणि त्याचा गैरवापर रोखण्यासाठी आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्थांच्या अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.आपल्या समाजाच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी त्यांचे सहयोगात्मक प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत, असेही गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

दरम्यान, अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने राजधानीत ५००० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. हे अमली पदार्थ ब्रिटनहून भारतात पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा पदार्फाश केला होता आणि चार ड्रग पेडलर्स तुषार गोयल, भरत कुमार जैन, औरंगजेब सिद्दीकी आणि हिमांशु कुमार यांना अटक केली होती. दिल्लीतील महिपालपूर येथील आरोपी तुषार गोयलच्या गोदामातून पोलिसांनी ५६२ किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR