पुणे : पुण्याला मंत्रिपद मिळाले त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सणसणीत टोला लगावला आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्री पद मिळाले.त्यानंतर देशात पुण्याला मिळालेले नेतृत्व यामुळे शहराचा विकास नक्कीच होईल परंतु पुण्यात प्रशासनच नाही, त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती आहे.
शिक्षणाचे माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात. मात्र, अशा घटनांनी पुण्याचे नाव खराब होत आहे. पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे. या पुढे मंत्री मोहोळ यांनी गुत्तेदारांचा फायदा बघण्यापेक्षा पुण्याचा विकास करावा. पुण्यात दिवसें दिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारीच्या विरोधात राष्ट्रवादीनं रस्त्यावर उतरले पाहिजे.
निकाल लागल्यापासून मी शांत झाले आहे. कारण आता जबाबदारी वाढली. पुण्यातल्या इन्व्हस्टमेट बाहेर जाणार नाही. यासाठी मराठा चेंबर्ससोबत बैठक घेणार, नोक-या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना पूर्णपणे मिळाला नाही, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, काल दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली. पुढची २५ वर्षाचा रोडमॅपवर चर्चा झाली. राज्यात आणि देशात संघटनेची ताकत कशी वाढेल यावर चर्चा झाली. कार्यकर्ते आणि जनतेने आम्हाला साथ दिली, त्यासाठी त्यांचे आभार. कार्यकर्ता खचला नाही, लढत राहिला, त्याचा अभिमान आहे.