27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमंत्रिमंडळाने राष्ट्रपतींकडे केली १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींकडे केली १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात हे विशेष. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा बरखास्त केली जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा झाली. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली.

या बैठकीनंतर मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. मोदी सरकारच्या दुस-या कार्यकाळातील मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुस-या दिवशी म्हणजे ८ जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR