29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वीच महत्वाची खाती समोर

मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वीच महत्वाची खाती समोर

नागपूर : वृत्तसंस्था
अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत महायुतीमधील ३९ आमदारांना मंत्रि­पदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक २०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ तर शिवसेना शिंदे गटाच्या १० आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट गृह मंत्रि­पदासाठी आग्रही होता, मात्र हे खाते भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्रालयासोबतच भाजपकडे महसूल, शिक्षण आणि पाठबंधारे ही खाती राहणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाला नगर विकास मंत्रालयासोबत गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी आणि मराठी भाषा ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ मंत्रालयासोबत, क्रीडा आणि सहकार खातं मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR