19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्य सादर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्य सादर

पुणे : प्रतिनिधी
येत्या २० नोव्हेंबरला राज्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी विविध ठिकाणी येथील ‘चला करू मतदान’ हे पथनाट्य सादर करण्यात आले.

नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे नाट्यसंहिता लिखित व दिग्दर्शित, केशव माधव न्यास आयोजित ‘चला करू मतदान’ हे पथनाट्य नागरिकांसमोर विविध मोक्याच्या ठिकाणी तसेच विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर एकूण ४० ठिकाणी सादर करण्यात आले. नवमतदार असलेल्या तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणा-या मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांना मतदान करण्याची प्रेरणा देण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

तसेच उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देखील देण्यात आली.शंभर टक्के मतदान करा, नोटा मतदान करू नका, योग्य उमेदवाराला मतदान करा, मतदार राजा असल्याने सजग राहून विचारपूर्वक, कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, मतदाराने स्वयंस्फूर्तीने मतदानाला बाहेर पडावे, लोकशाहीचे हात बळकट करावे असे फलक हातात धरले होते. विविध सोसायट्यांमध्ये, सेवा वस्त्यांमध्ये ५१ ठिकाणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्याचा निर्धार असल्याचे केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे यानी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR