19 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्रावरच उमेदवाराचा मृत्यू

मतदान केंद्रावरच उमेदवाराचा मृत्यू

बीड : प्रतिनिधी
बीड मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे. मात्र, मतदान सुरू असतानाचा मतदान केंद्रावर उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बाळासाहेब शिंदे असे मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणा-या मतदान केंद्रावर ते थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले.
शिंदे यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

केंद्राध्यक्षाला हृदयविकाराचा झटका
परळी विधानसभा मतदारसंघातील परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

केजमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा
बीडमधील केज विधानसभा मतदारसंघात विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR