23.3 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरमतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

रेणापूर : प्रतिनिधी
महायुती सरकारने महिला, शेतकरी व तरुणांसह सामान्य जनतेची गळचेपी केली. आता आपल्याला ती गळचेपी दूर करायची आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार याशिवाय कायदा सुव्यवस्था, दळणवळणाची साधने, महिला सुरक्षा यासाठी आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करायचे आहे. जनतेने यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मागे आपली ताकत उभी करावी, असे आवाहन लातूर ग्रामीण विधानसभा निवडणूक- २०२४ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार  आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, गोविंदपुर, पाथरवाडी, मुरडव, मोहगाव, तळणी, आनंदवाडी या गावांमध्ये संवाद बैठकीमध्ये आमदार धिरज देशमुख बोलत होते. आमदार धिरज देशमुख पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस पक्षाने मला विधानसभेसाठी सलग दुस-यांदा संधी दिली. याबद्दल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचे मी आभार व्यक्त्त करतो. जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे २०१९ मध्ये मी आमदार झालो. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि त्यानंतर विधिमंडळ असा माझा प्रवास राहिला. आपण दिलेल्या संधी मुळे मी आपली प्रामाणिकपणे सेवा करु शकलो. आपले स्थानिक  प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला.
मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले
लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून दिले. आताही महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा येतील, असे सांगितले जात आहे. विरोधक कोण आहेत, याची चिंता मी कधी केली नाही. मतदारसंघातील शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, दळणवळण या सारख्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून विकास कामे झाली. येणा-या काळातदेखील आपल्याला आपल्या मतदारसंघात विकास कामाची गंगा आणायची आहे. यामुळे आपण सर्वांनी येणा-या २० नोव्हेंबर रोजी हाताचा पंजा समोरचे बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन देखील धिरज देशमुख यांनी केले.
बालाजी मंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार
आपल्या भागातील संस्था या मजबुतीने चालल्या पाहिजेत. आपण सर्वांनी मिळून सकारात्मक पद्धतीने काम केले पाहिजे. माझ्या कामाचा दाखला म्हणून मला पक्षाने या ठिकाणी पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. आपण दिलेल्या संधीमुळे मी विधिमंडळामध्ये आपले प्रश्न मांडून आपल्याला न्याय देण्याचे काम केले. या भागातील रस्ते, आगामी काळामध्ये पूर्ण केली जातील. तसेच गाव पातळीवर समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील आमदार धिरज देशमुखांनी दिली.
कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीने आरोग्य सेवेचे उत्तम काम केल्याची आठवण देखील याप्रसंगी देशमुखांनी करून दिली. रेणापूर तालुक्यातील गोविंदपूरसह परिसरांतील अनेक गावांचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजी मंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यांसाठी प्रयत्न करू, असा शब्द धिरज देशमुखांनी उपस्थितांना दिला. यावेळी यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, अ‍ॅड. प्रमोद जाधव, बाळासाहेब चव्हाण, धनंजय देशमुख, संभाजी रेड्डी, अनुप शेळके, प्रदिप राठोड, स्रेहल देशमुख, उमाकांत खलंग्रे, प्रमोद कापसे, किरण भगवते, सुभाष देशमुख, चंद्रकांत पवार, वामन पवार, रमाकांत पवार, सतीश चव्हाण, जगन्नाथ कांबळे, प्रदीप देशमुख, प्रताप देशमुख, पृथ्वीराज देशमुख, प्रदीप गंगणे, पृथ्वीराज देशमुख, प्रदीप देशमुख, ज्ञानोबा बिडवे, इलाई शेख, गोंिवदराव चव्हाण, सुभाष शिरसाट, दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, धनंजय देशमुख, अजय चक्रे, धनु चव्हाण, तात्यासाहेब चव्हाण, बाळकृष्ण माने, यशवंतराव देशमुख, शेषेराव हाके, चंद्रकांत पाटील, प्रकाश सुर्यवंशी, प्रदिप माने, नागनाथ कराड, चंद्रचुड चव्हाण, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, व्हा चेअरमन अनंतराव देशमुख, अ‍ॅड. प्रमोद जाधव, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड. शेषेराव हाके, माजी सभापती शिवराज सप्ताळ, प्रदिप राठोड, प्रमोद कापसे, प्रकाश सुर्यवंशी, धनंजय देशमुख, हनमंतराव पवार, विश्वनाथ कागले, प्रविण माने, नागनाथ कराड, डॉ. तात्याराव वाघमारे, मारुती गायकवाड, राजाभाऊ साळुंके, कृउबाचे संचालक व रेणाचे संचालक, आजी माजी चेअरमन, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR