22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमधुमेह, हृदयविकारासह ४१ औषधे होणार स्वस्त

मधुमेह, हृदयविकारासह ४१ औषधे होणार स्वस्त

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणा-या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय भारत सरकारने नुकताच घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत.

त्यानंतर, मधुमेह, अंगदुखी, हृदय, यकृत, अँटासिड, ऍलर्जी, मल्टिव्हिटॅमिन, अँटीबायोटिक्स इत्यादी किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे, आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या किंमती निश्चित केल्यामुळे ४१ औषधे स्वस्त होणार आहेत. यामुळे, तुम्हाला या सगळ्या आजारांवरील औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

औषधांच्या किमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय हा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या १४३ व्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, ‘एनपीपीए’ ही एक सरकारी नियामक संस्था असून जी भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे काम करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR