22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरमध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी आरक्षित

मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी आरक्षित

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात आठ मध्यम व १३४ लघू प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानूसार जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी आरक्षित केले आहे. अधीच पाऊस कमी पडला त्याच उन्हाची तीव्रता वाढल्याने दिवसेंदिवस प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. परिणामी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनही त्यादृष्टीने काम करीत आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.  लातूर जिल्हा पर्जन्याखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ठराविक काळानंतर पाणीटंचाई, कोरडा दुष्काळ हे निसर्ग चक्र सुरुच आहे. गतवर्षी मृग नक्षत्रापासूनच लातूर जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले होते. त्यातच अल निनोचा फटका बसल्याने जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही.
परिणामी यंदा जिल्ह्यातील अनेक गांवांना जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान जिल्ह्यातील तारवजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांत १०.६३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस प्रकल्पांतील पाणीसाठा घटतो आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाईची अभुतपुर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.
लातूर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या उंचावर आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गीक स्त्रोतच नाहीत. परिणामी लातूर जिल्हा हा पावसाळी पाण्यावरच अवलंबुन असलेला जिल्हा आहे. दर आठ-दहा वर्षांनी लातूर जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असतो. २०१६ च्या भीषण कोरड्या दुष्काळाशी जिल्ह्याने सामना केलेला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे मृगाच्या पेरण्याही उशिराने झाल्या.
त्यानंतर सतत रिमझिम पाऊस झाला. ऑगस्टपर्यंत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न घटले. यंदाही परतीचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसानेही दगा दिला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यातच यंदा अल निनोचाही जिल्ह्यात जबर फटका बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR