23.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमनपाची १५ जुलैपर्यंतच १०.५० कोटींची वसुली!

मनपाची १५ जुलैपर्यंतच १०.५० कोटींची वसुली!

लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीत चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या ५० दिवसातच कर संकलन विभागाने तब्बल १०.५० कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. मागील काही वर्ष्याच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली सर्वाधिक झाली आहे.

कर आकारणी व करसंकलन विभाग चालू वर्षपासून सातत्याने वसुलीचे नवनवीन उपक्रम राबवीत आहे. महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी जास्तीत-जास्त ऑनलाइन पधतीने मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी आखणी केली आहे. त्यानुसार प्रभावी बिल वाटप नियोजन, एसएमएस व लिंकद्वारे बिल पाठवले, सोशल मीडिया जनजागृती, विविध सवलतीच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्तत्त कर भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, थकबाकीदारावर कार्यवाही, मालमत्ता धारकाना एसएमएस करणे आदींवर करसंकलन विभागाकडून भर दिला जातोय, त्याचाच परिणाम १०.५० कोटी चे कर संकलन अवघ्या ५० दिवसात झाले आहे.

मनपा हद्दीत एकूण १०४००० मालमत्ता असून १५ जुलै अखेर ९८०० मालमत्ता धारकाणी टॅक्स भरला असून जवळपास १०.५० कोटीचे कर संकलन झाले आहे. कर अधिक्षक सतिष टेंकाळेसह सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर पर्यवेक्षक, वसुली लिपिक अथक प्रयत्न घेऊन प्रत्येक मालमत्ता धारका पर्यंत पोचण्याचा व त्यांना कर प्रणालीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. उर्वरित मालमत्ता धारकाणी कर सवलतींचा लाभ घेऊन आजच आपला कर भरुन शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन उपायुक्त्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR