22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरमनपाने शहरातील परवानाधारक होर्डिंग्ज स्ट्रक्चरवर तुर्त कारवाई करू नये

मनपाने शहरातील परवानाधारक होर्डिंग्ज स्ट्रक्चरवर तुर्त कारवाई करू नये

लातूर : प्रतिनिधी
मुंबईतील होर्डिंग्ज कोसळल्याचे दुर्घटनेनंतर राज्यातील विविध शहरातील होर्डिंग्ज काढण्याबाबत मनपा आयुक्तांकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्व नियमांचे पालन करून, मनपाचा रितसर परवाना घेवून व टॅक्स भरून ज्या होर्डिंग्ज व स्ट्रक्चरर्स आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येवू नये, स्ट्रक्चरमुळे काही अनुचित घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहिल, तसेच नुतनीकरणाचे प्रस्ताव नव्याने नियमानुसार दाखल करत आहोत, अशा आशयाचे शपथपत्र लातूर शहरातील नेटीजन्स मीडिया सर्व्हीसेस, विशाल ऍडस आणि इनेटिव्ह मीडिया या जाहिरात एजन्सीकडून एका निवेदनादरे लातूर महानगरपालिकेला कळवण्यात आले आहे.

मुंबईच्या घटनेनंतर लातूर शहरातील होर्डिग्ज व त्याचे स्ट्रक्चर मनपा आणि काही जाहिरात एजन्सीजने स्वताहून काढून टाकले आहेत. लातूर शहरातील जाहिरात एजन्साीधारकांकडून होर्डिंग्जचे स्टॅबिलिटी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येत आहे. सदर जाहिरात व्यावसायावर हजारो कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतात. स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेवून ते दाखल करण्याचे कामही सुरु आहे. त्यामुळे मनपाने होर्डिग्ज स्ट्रक्चरवरील तात्काळ कारवाई करण्याची मोहिम थांबवावी. होर्डिग्ज स्ट्रक्चरमुळे कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास संबंधित जाहिरात एजन्सी जबाबदार राहील अशा आशयाचे शपथपत्र मनपाच्या सांगण्यावरून जाहीरात एजन्सीधारकांनी लातूर मनपाला दिले आहे. मनपाच्या नियमांनुसार जाहीरात एजन्सीधारक सर्व कागदपत्रांची पुर्तता करीत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने जाहिरात एजन्सीजसाठी सहकार्याची भूमिका घ्यावी. अशी विनंती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR