26.4 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रमयताचे शीर घेऊन मारेकरी थेट पोलिस ठाण्यात

मयताचे शीर घेऊन मारेकरी थेट पोलिस ठाण्यात

नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र एका हत्येच्या घटनेने हादरला आहे. पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी औट पोस्ट (ता. दिंडोरी) येथे गावच्या भरवस्तीत सकाळी दहाच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची धारदार कु-हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मयताचे शीर घेऊन कु-हाडीसह पोलिस ठाण्यात पोहोचला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ननाशी औट पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता. या वादाच्या कारणावरून वाडीव-हे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती.

मात्र, आज (दि.१) नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यांत वाद उफाळून येऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कु-हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलिस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला. या खुनाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR