22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरमरसांगवीजवळील पुरात ट्रॅक्टर चालक बचावला

मरसांगवीजवळील पुरात ट्रॅक्टर चालक बचावला

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये सलग चोवीस तासापासून पाऊस कोसळत असल्यामुळे , अनेक साठवण तलावाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर अनेक साठवण तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत यामध्ये माळहिप्परगा येथील साठवण तलाव पूर्णपणे भरला आहे . यामुळे सांडव्यामधून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे.
दि २५ जुलै रोजी दुपारी चारच्या दरम्यान डोंगरगाव पाटीवरून ट्रॅक्टरचालक रावणकोळाकडे चालला होता. दरम्यान मरसांगवी ते रावणकोळा दरम्यान असलेल्या मरसांगवी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते, असे असतानाही जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पुराच्या पाण्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे ट्रॅक्टर पाण्याबरोबर वाहू लागला आणि पुलाच्या बाजूला जाऊन अडकला. ट्रॅक्टरवर असलेल्या ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरवरच होता. यावेळी गावातील बजरंग देवकते यांनी सदरील ट्रॅक्टर चालकाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. हा ट्रॅक्टर रावणकोळा येथील उत्तम हुंडेकर यांचा आहे .
  जळकोट तालुक्यातील अतनूर जवळील जुना पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पर्यायी पूल उभा करण्यात आला होता हा पर्याय पुलही शनिवारी वाहून गेला आहे. तेव्हापासून अतनूर गावाचा संपर्क अन्य गावाशी तुटला आहे. आतनूर येथील गावक-यांना मरसांगवी मार्गे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग होता हा मार्गही आता पुराच्या पाण्यामुळे बंद पडला आहे . यामुळे अतनूर ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
  जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर अडकल्याची माहिती येथील सरपंच रवी गोरखे यांनी दिली ही माहिती  मिळताच जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पुराच्या पाण्यामधून कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले.  माळहप्पिरगा येथील साठवण तलाव भरल्यामुळे सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात येत असून या पाण्यामुळे पुलावरून पाणी जात आहे तसेच येणा-या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अति महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR