27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमराठवाड्यातील लोकसभेच्या अधिक जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील

मराठवाड्यातील लोकसभेच्या अधिक जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे नाव सध्याच्या राजकारणामुळे डागावलेल आहे ते आपणाला पुसून टाकायचे आहे. महाविकास आघाडीचा विचार समतेचा, बंधुभावाचा, प्रगतीचा सर्वांच्या सुरक्षिततेचा आहे, त्यामुळे मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या अधिक जागा निवडून येतील, अशी ग्वाही राज्याचे माजी वैदिकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
लातूर लोकसभेचे इंडीया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ दि. २९ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील जुना औसा रोडवरील  प्रा. संजय जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित महाविकास आघाडी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला, या प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव बाजूळगे, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, सचिन बंडापल्ले, रविशंकर जाधव, संजय निलेगावकर, काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १७ चे अध्यक्ष प्रवीण घोटाळे, सुपर्ण जगताप, प्रवीण सूर्यवंशी,  उमेश पाटील भुसने, भंडारे, दीपक कोटलवार, श्रीशैल गडगडे, संकेत उटगे, केशव जगताप, अजय पाटील, सागर मुसांडे आदीसह प्रभाग १७ मधील काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख नागरीक, जगताप कुटूंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेत खूप मोठी संधी असते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्यात डिझास्टर मॅनेजमेंट युनिट, बीएसएफ केंद्र आणले. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात रेल्वे आणली, विमानतळ केले, उडान योजनेअंतर्गत लातूरच विमानतळ सुरु होईल, वंदे भारत ट्रेन ही सुरु झाली पाहिजे, लातूर-पुणे इंटरसिटी कायम राहिली पाहिजे, महिलांचे, शेतक-यांचे, बेरोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्या, असे ते म्हणाले. लातूर हे मिनी कोटा आहे, येथून सोळाशे डॉक्टरचे अ‍ॅडमिशन झाले लातूरच्या काम करण्याच्या परंपरेचा आलेख डॉ. काळगे यांच्यामुळे आणखी उंचावेल, जनतेच्या जीवावरच आम्ही राजकारण करतो, काम करणा-याची जनता नोंद घेते जनतेनेही आम्हाला आशीर्वाद दिले असे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले.
महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या चेह-यावरील उत्साह बघून आम्हीही उत्साहाने काम करत आहोत. महाविकास आघाडीच्या घटकांसोबत समन्वय राखून ही निवडणूक आपणाला जिंकायची आहे, पाठीमागे जनता फसव्या जाहिरातीला फसली, ती आता फसणार नाही. मी २६ वर्षांपासून २४  तास जनतेच्या सेवेत आहे, पुढेही असे २४ तास जनतेच्या सेवेत कायम राहील त्यामुळे सर्वांनी मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय जगताप यांनी केले, तर संजय निलेगावकर, प्रा. भुसने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत वाडीकर यांनी केले, तर शेवटी आभार शास्त्री  यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR