29 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला

मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

अकोला : प्रतिनिधी
मला भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, आपण ज्यावेळी सुरतला गेला होता त्यावेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचे काम पडले तर गेम करून टाका.

तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली गेली, मला हृदयविकाराचा झटका आलाय म्हणून. मात्र दिल्लीवरून फोन येतो आणि ऐकत नसेल तर मारून टाका, असे त्यावेळी सांगण्यात आले. हे सर्व मला एका भाजपच्या आमदाराने सांगितले असल्याचा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासमोर भाषणातून आमदार देशमुखांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणा-या मुलीचीही एसीबीकडून चौकशी लावली आहे. परंतु आपण कधीही डगमगलो नाही. आपण सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की, आमदार देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्याला कोणताही झटका आला नव्हता असे म्हणत नितीन देशमुखांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. दरम्यान, मला पराभूत करण्यासाठी आज कटकारस्थान रचले जात असल्याचेही आमदार देशमुखांनी यावेळी म्हटले आहे.

चौकशीचा ससेमिरा मुद्दामहून
मी गद्दारांबरोबर गेलो नाही यामुळे चौकशीचा ससेमिरा
मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशेबी मालमत्तेबाबत चौकशी केली जात आहे. २०१९च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माझी संपूर्ण संपत्तीची स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशेबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. गद्दारांबरोबर मी गेलो नाही. यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे. त्या काळातलीही चौकशी झाली पाहिजे. ती का होत नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. माझी चौकशी बंद रूममध्ये नव्हे, तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे, असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR