शोरनूर : वृत्तसंस्था
चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या मल्याळम अभिनेत्री मीना गणेश यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका मीना गणेश यांनी साकारल्या आहेत. १०० पेक्षा जास्त चित्रपटांत अभिनय करणा-या या ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
वृद्धापकाळामुळे त्यांच्यावर शोरनूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १९७६ पासून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक कामे केली. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.
१९७६ पासून ज्येष्ठ कलाकार मीना गणेश मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावर सतत सक्रिय होत्या. त्यांच्या आठवणीत राहणा-या चित्रपटांपैकी एक म्हणजे वासंथियम लक्ष्मीयम पिन्ने नजानुम. या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मीना गणेश गेल्या दोन वर्षांपासून अभिनयापासून दुरावल्या गेल्या होत्या.
एसएल पुरम सूर्या सोमा, कायमकुलम केरळ थिएटर आणि थ्रिसूर चिन्मयी यांसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये अभिनय करून स्वत:ला सिद्ध केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मीना या प्रसिद्ध अभिनेते, नाटककार ए. एन. गणेश यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दिग्दर्शक मनोज गणेश आणि संगीता ही दोन मुले आहेत.