25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमविआचा फॉर्म्युला ठरला!

मविआचा फॉर्म्युला ठरला!

६० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे- पवार आणि कॉंग्रेसचे ठरले असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप जवळपास ६० टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे.

२८८ पैकी १०० जागा काँग्रेस, १०० जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर ८४ जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, असे बोलले जात आहे तर उर्वरित ४ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. २०१९ साली जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीच ठरले. तीनही पक्षाच ६० टक्के जागांवर एकमत असल्याची माहिती आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम पण लवकरच सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीचे जवळपास ८० टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा करण्यात आली आहे. १२० ते १३० जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुस-या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

तिढा असलेल्या जागांवर
शेवटच्या टप्प्यात निर्णय?
तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भातसुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR