25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमस्क अन् पंतप्रधान मेलोनीची डेट?

मस्क अन् पंतप्रधान मेलोनीची डेट?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवून गेल्याचे दिसून येत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगचीच चर्चा रंगली आहे.

मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी मस्क यांनी मेलोनी यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांचा त्यांनी इमानदारी आणि सच्चाई असलेले व्यक्तिमत्व, असा उल्लेख केला.

मेलोनी यांना अ‍ॅटलांटिक काऊन्सिल ग्लोबल सिटीझन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मस्क यांनी मेलोनी यांच्या सौंदर्याचेही कौतुक केले. त्या बाहेरुन जितक्या सुंदर आहेत त्यापेक्षाही त्या आतून सुंदर आहेत, असे मस्क म्हणाले.

मस्क म्हणाले की, जॉर्जिया मेलोनी यांचे व्यक्तिमत्व हे कौतुक करण्यासारखे आहे. त्यांनी इटलीच्या पंतप्रधान म्हणून केलेले काम अविश्वसनीय आहे. त्या अस्सल, इमानदार आणि ख-या आहेत. प्रत्येक राजकीय नेत्याकडे हे गुण नसतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR