23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरमहाभ्रष्ट, निष्क्रिय सरकारच्या विरोधात चिखल फेको  

महाभ्रष्ट, निष्क्रिय सरकारच्या विरोधात चिखल फेको  

लातूर : प्रतिनिधी
महाभ्रष्ट निष्क्रिय राज्य सरकारच्या विरोधात लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. २१ जुन रोजी सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखल फेको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे हे अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले.  राज्य सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रीयतेचा नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या रोषाला वाचा फोडण्यासाठी लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिमात्मक पुतळयास चिखल लावून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अनुसूचित जाती काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, लातूर तालुका सुभाष घोडके, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील, रवीशंकर जाधव, गोरोबा लोखंडे, प्रवीण सूर्यवंशी, दगडुअप्पा मिटकरी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, रमेश सूर्यवंशी, शरद देशमुख, मारोती पांडे, आयुब मणियार, प्रा. प्रवीण कांबळे, बालाजी साळुंके, राम स्वामी, श्रीकांत पाटील, डॉ. अरविंद भातांबरे, सोनू डगवाले, प्रा .सुधीर अनवले, गोविंद देशमुख, शेख कलीम, राजकुमार माने, हमीद बागवान, युसूफ बाटलीवाले, तबरेज तांबोळी, मनोज देशमुख, धनंजय शेळके, बंदेनवाज सय्यद, यशपाल कांबळे, असलम शेख, बाळासाहेब करमुडे, राहुल दुमने, सुलेखाताई कारेपूरकर, पवनकुमार गायकवाड, सिराज शेख, किरण बनसोडे, अभिजित इगे, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, विजय टाकेकर, पिराजी साठे, पवन बनसोडे, राज क्षीरसागर, राजू गवळी, ख्वॉजापाषा शेख,लक्ष्मीताई बटनपुरकर यांच्यासह  लातूर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, फ्रंटल ऑर्गनायझेशन अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व इतर सर्व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR