31.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeमहाराष्ट्रमहामहीम दीदीजी मुर्मू चित्रपटाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार

महामहीम दीदीजी मुर्मू चित्रपटाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित महामहीम दीदीजी मुर्मू या चित्रपटाचा दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार जाहीर झाला होता. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक बी. के. पंपोष मिश्रा आणि अभिनेत्री सम्पा मंडल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रदर्शित होण्याअगोदरच या चित्रपटाला ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

नाशिक येथे पार पडलेल्या ११ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अत्यंत हलाखीच्या स्थितीत आपले जीवन व्यथित करून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचे काम केले. त्यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब या चित्रपटातून दिसून येते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ब्रम्हकुमारी संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे अध्यात्मिकतेतून त्यांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडून आला, हे या चित्रपटातून दाखवून देण्यात आले. या चित्रपटाचा दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या चित्रपटाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे कलाकार संपा मंडल यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तर उत्कृष्ट पटकथा लेखनासाठी ब्रम्हकुमार पंपोष मिश्रा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या ओम शांती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ब्रम्हकुमारी मिश्रा निर्मित आणि ब्रम्हकुमार पंपोष मिश्रा दिग्दर्शित राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला सेन्सर प्रमाणपत्र मिळण्याआधीच तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटात बाल कलाकार एल. आकांक्षाने द्रौपदी मुर्मू यांची बालपणीची भूमिका साकारली. या चित्रपटाला संगीत सुनील दधीच व नरेंद्र पुरोहित यांचे आहे.

लातूरच्या कवयित्री
सुरभी यांची गीतरचना
या चित्रपटातील गीतरचना लातूर जिल्ह्यातील हिप्परगा (ता. औसा) येथील मूळ रहिवासी आणि धाराशिवच्या स्नुषा असलेल्या भाग्यश्री भोजने (सुरभी) यांनी केली असून, प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी हे गीत गायिले आहेत. थेट देशाच्या राष्ट्रपतींच्या जीवनावर आधारित चित्रपटात गीतरचना करण्याचे भाग्य भाग्यश्री भोजने यांना लाभल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR