24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत ठिणगी

महायुतीत ठिणगी

किर्तीकरांच्या वक्तव्यावरून पुन्हा वादाला फुटले तोंड
मुंबई : प्रतिनिधी
देशातून भाजपला भक्कम पाठिंबा मिळत आहे. पण ईडीमुळे जनतेत चीड निर्माण झाली आहे. लोक ईडीच्या कारवाईला कंटाळले आहेत. त्यामुळे आता ईडीचे प्रयोग थांबविले पाहिजेत, असे माझे स्पष्ट मत असल्याचे शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. त्यांचे पुत्र तथा ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबाबतही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावरून महायुतीत ठिणगी पडली असून, भाजप आमदार अमित साटम यांनी कीर्तिकरांचे शरीर शिंदेंसोबत आणि आत्मा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे, अशा शेलक्या शब्दांत टीका केली. त्यामुळे यावरून महायुतीत ठिणगी पडली आहे.

गजानन किर्तीकर यांनी अमोल आणि सूरजवर खिचडी घोटाळ््यासंदर्भात आरोपांचा राग येतो. संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये अमोल किंवा सूरज भागीदार नाहीत. पण सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. त्या कंपनीला प्रॉफिट झाले, त्यानंतर अमोल आणि सूरजला चेकने मानधन मिळाले. ते पैसे बँकेत टाकले, त्यावर इन्कम टॅक्सही लागला. यामध्ये मनी लाँड्रिंग नाही, असेही म्हटले.

यावेळी त्यांनी मी उत्तर-पश्चिममधून निवडणूक लढत नाही. ठाकरे गटाचा उमेदवार अमोल कीर्तिकर आहे. पण आमचा महायुतीचा उमेदवार जाहीर होईल, तेव्हा पूर्ण ताकद लावणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीच काम करणार, असेही ते म्हणाले. परंतु त्यांनी अमोल किर्तीकर यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू असल्याने त्यांनी थेट ईडीच्या कारवाया थांबवाव्यात असे म्हटल्याने भाजपने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून, यावरून आता महायुतीत ठिणगी पडली आहे.

त्यामुळे किर्तीकर यांच्यावर भाजप आमदार अमीत साटम यांनी निशाणा साधला आहे. किर्तीकरांचे शरीर शिंदेंसोबत आणि आत्मा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे, अशी टीका त्यांनी केली. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहेत.

अमोल किर्तीकरांच्या
खात्यात ९५ लाख कसे?
मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले. ईडीपासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचा-यांना आहे. जर कर नाही तर डर कशाला, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या अकाउंटमध्ये खिचडीच्या कंत्राटदाराकडून ९५ लाख रुपये आलेच का, याचे उत्तर द्यावे, भ्रष्टाचारियो की खैर नही! कार्यवाही तो होगी ही, अशी टीका अमीत साटम यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR