24.2 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर

मुंबई : प्रतिनिधी
शिंदे सरकारने आज (शुक्रवार) विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा बजेट सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्पात महिलांना १२०० ते १५०० रुपये दरमहा, बेरोजगारांना दरमहा ५ हजार रुपये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना, घोषणा करण्यात आली. ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव अजित पवार यांनी मांडला.

लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकार लागू करणार आहे. १९९४ ला महिला धोरण जाहीर झाले. महिलांसाठी सरकारनं विविध योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या २१ ते ६१ वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. त्यासाठी ४६००० कोटी रुपये लागतील, असे अजित पवार म्हणाले.

महिलांना १० हजार पिंक रिक्षा
राज्यात महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येतील. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये उत्पन असलेल्या मुलींची १०० टक्के फी भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

शेतक-यांसाठी महत्त्वाच्या योजना –

कापूस सोयाबीन उत्पादकांना ५ हजारांचे हेक्टरी अनुदान दिले जाईल. ५ हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतक-यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

गाईच्या दुधासाठी ५ रुपयांचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ जुलैपासून हे अनुदान देण्यात येणार.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाखांची मदत देण्यात येणार

शेतक-यांना मोफत उर्जेसाठी मागेल त्याला सौरऊर्जा प्रकल्प, शेतक-यांना दिवसा अखंडीत विजपुरवठ्यासाठी निधी देण्यात येणार

जलयुक्त शिवारासाठी ६५० कोटीचा निधी

येत्या दोन वर्षात १६३ सिंचन प्रकल्प पूर्ण होतील. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून १५००० कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे. ३२०० कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे. शेतक-यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी १५००० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे.

सांगली येथील म्हैसाळ सौर ऊर्जा प्रकल्प
ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. शेतक-यांना १ रुपयात पीकविमा देण्याची योजना कायम करणार. तसेच गाव तिथे गोदाम योजनेसाठी ३४१ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. १०८ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यात देण्यात आली.

शेती कृषीपंपाचे सर्व थकीत बिल माफ करण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू
दरवर्षी १० हजार रुपये भत्ता मिळणार आहेत. तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार.

१० तरुण तरुणांना दरमहा १० हजार रुपये देण्यात येणार. बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या संस्थांमधून ५२ हजार नोक-या प्राप्त, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

तृतीयपंथियांना शासकीय योजनांचा लाभ

तृतीयपंथियांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार तसेच शासकीय भरतीत देखील समावेश करण्यात येणार आहे.

व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठा निर्णय

शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी मोफत प्रवेश शुल्क व उच्च शिक्षण देण्यात येणार आहे.

अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुमारे २ लाख ५ हजार मुलींना याचा फायदा मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार

इंधनावरचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर केला. एम एम आर भागात हा दर कमी केला. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. ठाणे, मुंबई, नवी मुंबईत पेट्रोलचे दर ६५ पैसे कमी करण्यात आले.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेतून पात्र कुटुंबाना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शुभमंगल योजनेचा निधी वाढवला
विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या घोषणेंतर्गत आता १० हजारांऐवजी २० हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. तर, गाईच्या दूध उत्पादक शेतक-यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर ५ रुपयाचे अनुदान १ जुलैपासून देण्यात येणार

नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणा
राज्यात सध्या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर्स आहेत. २०३५ पर्यंत १ लाख लोकसंख्ये मागे १०० हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, जालना, ंिहगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिांधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहे.

मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ
राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत ८लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील २ लाख ५हजार मुलींना होणार असून २०२४ -२५ पासून ही योजना सुरू होत आहे.

वारीच्या प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी
संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच, वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणा-या नोंदणीकृत दिंड्यांना, प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेचस, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचेही घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR