22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत जागावाटपाची तिढा नाही

महाविकास आघाडीत जागावाटपाची तिढा नाही

बैठकीनंतर नाना पटोले यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी

लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची शुक्रवारी सायंकाळी येथील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक पार पडली. दोन तासांपेक्षा जास्तवेळ चाललेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. मात्र, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा १७ तारखेला मुंबईत समारोप आहे. या कार्यक्रमाच्या तयारीत असल्याने सध्या जागावाटप जाहीर न करता मुंबईतील कार्यक्रमानंतर जागावाटप जाहीर केले जाईल, असे सांगितले.

यावेळी त्यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही मुंबईतील महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांना यासंबंधीचे निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर या सभेला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वंचित आघाडी महाविकास आघाडीत असल्याचा दावा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. परंतु खुद्द अ‍ॅड. आंबेडकर हे स्बळावर लढण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR