26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूर‘मांजरा’ तील पाणीसाठ्यात २.६५ टक्क्यांनी वाढ

‘मांजरा’ तील पाणीसाठ्यात २.६५ टक्क्यांनी वाढ

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांत २.६५ टक्क्यांनी वाढ झाली. पाटोदा तालुक्यात शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मांजरा धरणातील एकुण पाणीसाठा १०.०० टक्क्यांवर होता.
पाटोदा तालुक्यात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ७२ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणााच्या वरच्या बाजूने मांंजरा नदीत खुप मोठ्या प्रमाणात पाणी आले. परंतू, शनिवारच्या पावसानंतर पाटोदा तालुका परिसरात पाऊस पडला नाही. त्यामुळे पाटोदा तालुका ते धनेगावचे मांजरा धरणापर्यंतचा ८० किलो मीटरचा प्रवास करीत रविवारी पहाटे पाणी मांजरा धरणात पोहंचले. मांजरा धरणात सकाळी ६ वाजता ६०.१२९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. दुपारी ३ वाजेपर्यंत मांजरा धरणातील पाणीसाठा ६३.४३९ दशलक्ष घनमीटर झाला. या कालावधीत मांजरा धरणातील पाणीसाठ्यात ३.३१ टक्क्यांनी वाढ झाली. सायंकाळी ६ वाजता मांजरा धरणाचा पाणीसाठा ६४.१३० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला. दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मांजरा धरणात सर्वाधिक येवा होता. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांत मांजरा धरणात २.६५ टक्क्यांनी वाढ झाली. सायंकाळी ६  नंतर मांजरा धरणात ४५५४ क्यूसेसने पाण्याचा येवा सुरु होता.
लातूर जिल्ह्यात मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे, लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातल रेणापूर, व्हटी, उदगीर तालुक्यातील तिरु, देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, घरणी व निलंगा तालुक्यातील मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प तर १३४ लघू प्रकल्प आहेत. या एकुण १४४ प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प पुर्ण भरलेले आहेत. ७ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. ९ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २४ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ४४ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा आहे. ३४ प्रकल्प जोत्याखाली असून ४ प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR