लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात दर तीन वर्षांतून एकदा तरी पावसाचा लहरीपणामुळे कधी दुष्काळ पडत असतो कधी उसाची अडचण असते कधी अतिरिक्त उस असतो अशा बिकट संकटातून जात असताना उस उत्पादक शेतक-यांच्या मदतीला धावून येणारे मराठवाडा व विदर्भात सर्वाधिक शेतक-यांना अधिक भाव देणारे मांजरा साखर परिवारातील कारखाने म्हणून राज्याला परिचित आहेत त्या परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी यावर्षी उस उत्पादक शेतक-यांना पहिला हप्ता म्हणून २ हजार ७०० रूपये देण्याची घोषणा केली नव्हे तर तातडीने खात्यावर जमा केले ही एक विश्वासाची परंपरा जपलेला परिवार आहे. उस उत्पादक शेतक-यांना जादा भाव दिल्याबद्दल गुरुवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, राजेन्द्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजकुमार कसबे, नवनाथ शिंदे, दत्ता किनकर, प्रज्योत हुडे, अशोकराव दहिफळे, अमर हईबतपुरे यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक गणपतराव बाजूळगे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, दयानंद बिडवे, साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.