20.7 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeलातूरमांजरा परिवाराने शेतक-यांचे जीवनमान उंचावले 

मांजरा परिवाराने शेतक-यांचे जीवनमान उंचावले 

लातूर : प्रतिनिधी
चिंचोलीरावच्या माळरानावर विकासरत्न विलाराव देशमुख यांनी त्यांच्या सर्व सहका-यांना सोबत घेत ४० वर्षांपूर्वी मांजरा सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली. ही घटना शेतक-यांचे भाग्य बदलणरी ठरली. एक, दोन, तीन नव्हे तर आता दहा ते बारा साखर कारखांचा मांजरा साखर परिवार निर्माण झाला आणि याच मांजरा परिवानाने शेतक-यांचे जीवनमान उंचावले. विकारत्न विलासराव देशमुख यांनी करून दाखवले. त्यांच्याच विचारांचा, विकासाचा वारसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख व त्यांचे सर्व सहकारी जनसामान्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत.
विकासाची ही वीण कायम ठेवण्यासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,  असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महाराणा प्रतापनगर व लातूर शहरातील श्री ज्ञानसरस्वती संगीत कला विद्यालयात दि. १६ नोव्हेंबर रोजी आयोजित महिला संवाद बैठकी श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. या वेळी सुनिताताई आडे, संगिताताई पतंगे, उषाताई राठोड, मनीषाताई आडे, सुनिता बोरगावकर, सरोज बोरगावकर, डॉ. राम बोरगावकर, तुकाराम पाटील, डॉ. सुदाम पवार, बाबूराव बोरगावकर, गणेश बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात २४०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला. या निधीतून मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा, शेतक-यांसाठी आवश्यक वीज वाहिन्या, ट्रान्सफार्मर या सर्व गोष्टी करीत असतानाच लातूर शहराचाही विकास केला. शहरातील रस्ते, नाल्या, शादीखाना, समाज मंदिर, विलासराव देशमुख माता- बाल रुग्णालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या सा-या गोष्टी त्यांनी केल्या. शिवाय साखर कारखानदारीच्या माध्यमातून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातूनही शेतक-यांच्या मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहासाठी मदत, निराधारांना आधार देण्याचे काम सुरूच आहे.
 मतदारांनी अमित देशमुख यांना तिन्ही वेळा आशीर्वाद दिला त्यामुळे ते आपली सेवा करू शकले. यंदाही मतदारांनी अमित देशमुख यांना भरभरून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले. भाजपा महायुतीच्या सरकारने जनसामान्यांसह शेतकरी, युवकांनाही फसवले आहे. खोटारड्याचे सरकार कायमचे घालविण्यासाठी दि. २० नोव्हेंबर रोजी अमित देशमुख यांच्या नावासमोरील हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन करून श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, विरोधकांनी लातूर शहर विधानसभा मदारसंघासाठी काहीच केलेले नाही. यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्यामुळे ते बुद्धीभेद करीत आहेत, अफवा पसरवत आहेत, दिशाभूल करीत आहेत. मतदारांनी या अफवांना बळी न पडता अमित देशमुख यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केले.
या वेळी मिराबाई राठोड, केश्.ारबाई राठोड, मुक्ताबाई जाधव, वर्षा राठोड, रेखा राठोड, दुर्गेश्वरी राठोड, कविता जाधव, शोभा पवार, उषा पवार, संगिता गांदळे, सुनिता पवार, शालुबाई राठोड, ममता पवार, संगिता राठोड, सुनिता राठोड, मालनबाई आडे, मनीषा जाधव, अरुणाबाई हागंरगे, मंगल राठोड, विमल राठोड, अल्का चव्हाण, निशा बनसुडे, वंदना राठोड, सविता राठोड, अमृता सूर्यवंशी, माधुरी काळे, पूजा काळे, मिनल तेलंग, रिया बोट्टेवार, सुरेखा बिराजदार, लक्ष्मी मदने, सुवर्ण पोदार, शामलबाई बिराजदार, संध्या कुलकर्णी, सारिका इंगळे, ज्योती कुंडे, वंदना कुलकर्णी, वैशाली बोरगावकर, पल्लवी पवार, दीपाली पवार, जयश्री साठे, किरण काळे, सुकेशनी रेड्डी, संजीवनी खडके, शोभावणी पात्रे, राजेश्वरी पात्रे, जयश्री सगर, गायत्री सगर, आरती सगर, बालिका सूर्यवंशी, कौशल्या हजारे यांच्यासह आदी महिला, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR