19.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमाऊलींच्या रथावर संतांचा जीवनपट फुलांनी साकारणार

माऊलींच्या रथावर संतांचा जीवनपट फुलांनी साकारणार

 

पुणे : वृत्तसंस्था
माउलींच्या दर्शनासाठी भाविक आसुसलेले असतात, त्यांच्या रथाची सजावटही तितकीच लोभस आणि नयनरम्य असते. आळंदीतील गरुड कुटुंबीय गेली ४० वर्षे हा रथ आकर्षक फुलांनी सजवीत आहेत. यंदा या रथावर संतांचे १५ जीवनप्रसंग रेखाटण्यात आले आहे.

माउलींच्या रथाला सजविण्याचे काम ४० वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी सुरू केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी हे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. माउलींच्या दर्शनाला होणारी गर्दी रथाचे मनमोहक रूप पाहून वारकरी थक्क होतात. प्रदीप गरुड हे रथासाठी मार्केट यार्डातून फुले आणतात. प्रत्येकवेळी रथ सजविण्यासाठी सुमारे २५ ते ३० हजारांची फुले लागतात. त्यात जर्बेरा, अ‍ॅन्थुरियम, लिली, झेंडू, मोगरा कार्नेशन या फुलांचा वापर केला जातो. १२ ठिकाणच्या मुक्कामांसह एकूण १५ वेळा रथ सजविला जातो.

माउलींची पालखी १२ ठिकाणी मुक्कामी राहिल्यानंतर त्यावर सजावट करण्याची संधी मिळते. त्यासाठी ते सर्व फुले पुण्यातील मार्केट यार्डातून आणतात. या १२ ठिकाणांसह आणखी ३ वेळा रथ सजविला जातो. अशा १५ वेळा रथावर आता माऊलींचा जीवनप्रसंग साकारण्यात येणार आहे. त्यात प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात येणार आहे. तसेच निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविताना अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हे जीवनप्रसंग पुन्हा फुलांमधून अनुभवता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR