26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरमाजी आमदार टी. पी. कांबळे यांचे निधन

माजी आमदार टी. पी. कांबळे यांचे निधन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील भूमिपुत्र माजी आमदार त्र्यंबक पांडूरंग कांबळे (टी. पी. कांबळे) वय ८२ वर्षे यांचे शनिवार दि. १५ जून रोजी दुपारी ४ च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुळ गावी लक्कडजवळगा ता.  शिरूर अनंतपाळ जि. लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
एका सामान्य कुटुंबातील शेतमजुर दांपत्याचा मुलगा ग्रामसेवक, एस टी महामंडळात अधिकारी पदावर सेवा करीत आमदारकी पर्यंत मजल मारणारे,  जनसामान्यात (अण्णा) म्हणून परिचित असलेले, हेर या राखीव मतदार संघाची पहिली पुर्नररचना झाल्यावर एस टी खात्यातील अधिकारी पदाची नौकरी सोडून आमदार की साठी आपले नशीब अजमावण्यासाठी  राजकीय पार्श्वभूमी नसलेले टी पी कांबळे यांनी आमदारकीसाठी १९७६ मध्ये हेर या राखीव मतदार संघातुन अपक्ष  उभे राहिले. ते अपक्ष आमदार म्हणून निवडूनही आले. ते १९७६ ते १९७८ हेर या राखीव मतदार संघाचे  पहिले आमदार म्हणून निवडून आले. हेर या राखीव मतदार संघाचे शेवटचे आमदार म्हणून भाजपा कडून २००५ ते २००९ या दरम्यान दुस-यांदा हेर या राखीव मतदार संघातुन निवडून आले. त्यांच्याच आमदारकीच्या काळामध्ये तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती झाल्या.
तालुक्यातील आमदार असल्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचे काम माजी आमदार टी. पी. कांबळे यांनी केले. त्याची शेवटची इच्छा राहून गेली ती खासदार होण्याची, शिरूर अनंतपाळला २००९ मध्ये दिवाळी च्या पाडव्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन लातूर लोकसभा निवडणूक लढविण्याची ईच्छा व्यक्त केली होती. पण पक्ष श्रेष्ठीनी संधी न दिल्या मुळे ते नंतर ही पक्षाचे काम करीत राहिले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR