25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयमाजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

गुरुग्राम : वृत्तसंस्था
माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नटवर सिंह यांनी २००४-०५ दरम्यान यूपीए सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम केले. १९६६ ते १९७१ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात कार्यरत होते. नटवर सिंह हे मूळ राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील राजघराण्यातील नेते होते. शिक्षणानंतर ते परराष्ट्र विभागात कार्यरत होते. मुत्सद्दी म्हणून के. नटवर सिंह यांची कारकीर्द खूप मोठी होती. ते पाकिस्तान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांत भारताचे राजदूत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR